शिक्षणमंत्री दीपक केसरकरांकडून
पूर परिस्थितीचा आढावा

तिलारी धरणाला भेट;ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना

⚡दोडामार्ग ता.२३-: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी सायंकाळी तिलारी धरणाला भेट दिली.धरणाचे पाणी तिलारी नदीत सोडण्यास सुरवात झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाचे काय नियोजन आहे याबाबत त्यांनी आढावा घेतला व अतिवृष्टीचा इशारा असेपर्यंत 24 तास सतर्क राहण्याचे आदेश दिले.
गेल्या काही दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी शनिवार पासून तिलारी नदीत सोडण्यात येत आहे. तालुक्यात उद्भवणारी संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तिलारी येथे येऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच तिलारी धरण व खळग्यातील धरणाचीही पाहणी केली व अधिकाऱ्यांना 24 तास सतर्क राहण्याचे आदेश दिले.
यावेळी तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, प्रभारी तहसीलदार संकेत यमगर, पोलिस निरीक्षक अरुण पवार, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले, तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर आदी उपस्थित होते. तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, तालुका संघटक गोपाळ गवस, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, तिलकांचन गवस, शहरप्रमुख योगेश महाले, संदीप गवस, कांता गोवेकर, राजेश गवस आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page