विद्युत वाहिनीचा शॉक लागून तिन
शेळ्याचा मृत्यू…

वैभववाडी नापणे येथील घटना:शेतकऱ्याचे सुमारे तीस ते पस्तीस हजाराचे नुकसान

⚡वैभववाडी ता.२३-:
वैभववाडी तालुक्यातील नापणे येथील शेतकरी दत्ताराम कोंडू काळे यांच्या मालकीच्या तीन शेळ्या विद्युत वाहिनीला शॉक लागून मृत्यू पावल्या. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे तीस ते पस्तीस हजाराचे नुकसान झाले आहे. परंतु या घटनेमुळे एमएसईबीचा गल्लत कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

काळे हे नेहमीप्रमाणे शेळ्यांना चरण्यासाठी घेऊन रानात गेले होते. रविवार दुपारी २ वाजताच्या सुमारास नापणे रेल्वे स्थानक नजीक माळरानावर शेळ्या चरत असताना विद्युत वितरण कंपनीची विद्युत वहिनी तुटून पडली होती. यातच 3 शेळ्या जागीच मरण पावल्या तीन शेळ्यांचे सुमारे तीस ते पस्तीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी आणि विद्युत वितरण कंपनीचे श्री कानडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

You cannot copy content of this page