अबीद नाईक यांचा आम. नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार

⚡कणकवली ता.२३-: कणकवली नगरपंचायतचे माजी नगरसेवक अबीद नाईक यांची राष्ट्रवादीचे अजितदादा पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आता आम्ही भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी महायुतीचे सरकार मिळून कणकवलीचा विकास करण्यासाठी सक्षम आणि तयार आहोत असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, अॅड विराज भोसले, संजय कामतेकर, रवींद्र गायकवाड, मेघा गांगण, राजश्री धुमाळे, अण्णा कोदे, किशोर राणे, चारूदत्त साटम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page