वनविभागाने उपाययोजना करावी: ग्रामस्थांची मागणी
⚡वेंगुर्ला ता.२३-: आडेली पलटडवाडी येथे शनिवारी सायंकाळी 5 वा. च्या सुमारास बिबट्याने रोहन मोहन मयेकर यांच्या गायीच्या वासरावर मानेवर व पाठीवर हल्ला केल्याने ते जखमी झाले.त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.येथील भागात बिबट्याचा वावर असल्याने
याबाबत वनविभागाने उपाययोजना करावीत,अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत वनविभागाला माहिती दिल्यावर वनपाल सावळा कांबळे,वनरक्षक सूर्यकांत सावंत यांनी भेट दिली.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हृषीकेश वेतोरकर, डॉ.धनंजय कुऱ्हाड यांनी जखमी वासरावर उपचार केले.आज वेंगुर्ले वन अधिकारी यांनी आडेली येथे भेट दिली.ग्रामस्थांनी स्वतः ची व जनावराची काळजी घ्यावी,असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.