⚡मालवण ता.२३-:
देवबाग येथील सेवानिवृत्त सैनिक आणि पर्यटन उद्योजक राजन कुमठेकर यांना कोकण भूमी प्रतिष्ठान कोकण क्लब यांचा कोकण आयडॉल पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मालवण येथील मातृत्व आधार फाऊंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे राजन कुमठेकर यांचा सत्कार करण्यात आला.
मातृत्व आधार फाउंडेशनचे संचालक असणाऱ्या राजन कुमठेकर यांच्या देवबाग येथील घरी संस्था पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन शाल, श्रीफळ, आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मातृत्व आधारचे फाउंडेशनचे संस्थापक, संतोष लुडबे, संचालक दादा वेंगुर्लेकर, देवबाग गावचे तडफदार कार्यकर्ते, सदा तांडेल, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे उपाध्यक्ष मिलींद झाड, पर्यटन व्यवसायिक बाबा मोरजकर, संदीप लुडबे आदी उपस्थित होते.