चौकुळ रस्ता पाण्याखाली…

तीन ते चार फुट पाणी, पर्यटक पडले अडकून

⚡आंबोली, ता.२३ अनिल चव्हाण-: चौकुळ येथे मुसळधार पावसामुळे रस्ता पूर्णपणे पाण्याखाली असून धोकादायक स्थिती आहे.रस्त्यात 3 ठिकाणी 3 ते ४ फूट पाणी आहे.अनेक पर्यटक अडकून पडले आहेत तात्काळ प्रशासनाने मदत पोचवावी माहिती पत्रकार अनिल चव्हाण यांनी आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात दिली आहे.

तसेच पोलिसांना देखील सांगितले आहे.चौकुळ बस देखील अडकली आहे.अनेक पर्यटक त्या ठिकाणी आहेत.दुचाकी स्वार देखील आहेत.पाणी वाढण्याची शक्यता आहे.त्याठिकाणी रेंज देखील नाही.बस देखील अडकून आहे.आंबोली घाटात देखील रस्त्यावर पाणी आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने याठिकाणी तात्काळ मदत पोचवणे आवश्यक आहे.दिनेश गावडे देखील सहकाऱ्यांसोबत तेथे आहेत. सध्या त्या ठिकाणी मदतीची गरज आहे.

You cannot copy content of this page