मळगाव येथे पेंटिंग व वॉटरफ्रुपिंग बाबत मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

*💫सावंतवाडी दि.०२-:* मळगाव येथील माळीचे घर येथे पेंटिंग व वॉटरफ्रुपिंग बाबत मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार ५ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत करण्यात आले आहे. चराठा गावचे सुपुत्र असलेले नारायण परब यांनी जिल्ह्यातील युवकांना या कलेचे ज्ञान देण्याच्या उद्देशाने या मोफत कार्यशाळेचे आयोजन केले आहे. पेंटिंगच्या टेक्चरमधील ब्रिकवर्क, ढोलपुरी, बबल्स, क्रॅश फिनिश आदी विविध डिझाईन बाबत तसेच वॉटर फ्रुपिंगबाबत परब प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत. युवकांनी या मोफत कार्यशाळेचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी ९०२८२८५९२४ या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन नारायण परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page