सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नाशिक विभागीय आयुक्त त्रिसदस्यीय समिती कडून करण्यात आले मूल्यमापन

यशवंत पंचायत राज अभियानात २०१९-२० आर्थिक वर्षात कोकण विभागातून पटकावला आहे प्रथम क्रमांक*

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०१-:* यशवंत पंचायत राज अभियान २०१९-२० या आर्थिक वर्षात कोकण विभागात प्रथम आलेल्या सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेचे नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील त्रि सदस्य समिती असलेल्या राज्यस्तरीय समितीने सोमवारी मूल्यमापन केले. सिंधूदुर्ग जिल्हा परिषद २०१८-१९ मध्ये सुद्धा कोकण विभागात प्रथम येत राज्यात सुद्धा प्रथम आली होती. तर कुडाळ पंचायत समिती सलग तीन वर्षे कोकण विभागात प्रथम येत आहे. तसेच सलग दोन वर्षे राज्यात प्रथम आली होती. आता पुन्हा सिंधूदुर्ग जिल्हा परिषद व कुडाळ पंचायत समिती कोकण विभागात प्रथम आल्या आहेत. गतवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा जिल्हा परिषद व कुडाळ पंचायत समिती राज्यस्तरीय स्पर्धेच्या अनुषंगाने मूल्यमापनला सामोरे जाण्यास सज्ज झाल्या होत्या. कोकण विभागात प्रथम आलेल्या सिंधूदुर्ग जिल्हा परिषद व कुडाळ पंचायत समितीचे राज्यस्तरीय मूल्यमापन करण्यासाठी नाशिक विभागीय समितिची शासनाने नियुक्ती केली आहे. ही समिती सोमवारी १ मार्च रोजी जिल्ह्यात दाखल झाली आहे. यामध्ये नाशिक आयुक्त कार्यालयाचे तपासणी विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष सांगळे, चौकशी विभागाचे सहाय्यक आयुक्त राजन पाटील, विकास विभागाचे सहाय्यक संचालक चंद्रकांत वानखेडे याचा समावेश होता. या समितीने आज जिल्हा परिषदेला भेट घेत दप्तरांची तपासणी केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यानी समितीचे स्वागत केले. यावेळी शिक्षण व आरोग्य समिती सभापती सावी लोके, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर आदी उपस्थित होते. फोटो ओळ:-सिंधूदुर्गनगरी:यशवंत पंचायतराज अभियान राज्यस्तरीय मूल्यमापनसाठी दाखल झालेल्या समितीचे स्वागत करताना अध्यक्षा समिधा नाईक, सोबत सभापती सावी लोके, शारदा कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर

You cannot copy content of this page