अभ्यासू, संयमी तेवढेच आक्रमक राजकारणी म्हणजे “दीपक केसरकर”

मुत्सद्दी नेता म्हणून राज्यासह देशात निर्माण केलीय वेगळी ओळख;शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा आज वाढदिवस

⚡सावंतवाडी ता.१८ प्रसन्न गोंदावळे-: राजकारणात गरजेनुसार आक्रमकपणा, संयमता असणे गरजेचे आहे. हे ज्याला जमले तो राजकारणी म्हणून यशस्वी झाला. ही कला सिंधुदुर्ग पुत्र, सावंतवाडी विधानसभेचे आमदार आणि विद्यमान शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आत्मसात करीत नगराध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री अशी राजकीय प्रगती साधली आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांच्या यशस्वी कारकीर्दीचा ग्लोबल मालवणी चॅनलने घेतलेला आढावा.

शांत, संयमी, सुसंस्कृत अन् अभ्यासू राजकारणी म्हणून मंत्री केसरकर यांची महाराष्ट्रासह देशात वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. एक मुत्सद्दी नेता. रोटरी क्लब अध्यक्ष, सावंतवाडी नगराध्यक्ष ते राज्याचा शालेय शिक्षणमंत्री, हा त्यांचा प्रवास अविस्मरणीय आहे. अभ्यासू वृत्ती हा त्यांचा गुण यशस्वी होण्याचा एक प्रमुख मार्ग ठरलेला आहे. त्यांच्याकडे माणसं जोडण्याची हातोटी आहे. त्यांचे साधे राहणीमान आणि शांतपणे काम करण्याची पद्धत अन्य राजकीय व्यक्तींनी घेण्यासारखी आहे. त्यांचे राजकीय डावपेच तर साधारणशाला न उलगडणारं कोड आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नंतर शिवसेना अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिली आहे. कॉंग्रेसच्या विभागणीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेत कोकणात सावंतवाडी मतदारसंघात सेना-भाजपचा अश्वमेध रोखणारा हा कार्यकर्ता आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर खुश होत तत्कालिन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घालून देण्यासाठी दिल्लीत आमंत्रित केल होत. परंतु, केसरकरांनी हाती शिवबंधन बांधलं. पहिल्याचवेळी गृह व वित्त राज्यमंत्री म्हणून नंबर वन काम केलं. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे केसरकर सेना-भाजपचे दुवा बनले. २०१९ ला युती तुटून महाविकास आघाडीच भिन्न विचारसरणींच्या तीन पक्षांचं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, तिन पक्षातील नेत्यांचे ना विचार जुळले ना मन. अशावेळी नरेंद्र मोदींसोबत उद्धव ठाकरेंची भेट घालून देत पुन्हा युतीच्या सरकार स्थापनेसाठी पुढे आलेला नेता म्हणजे दीपक केसरकर. पण, उद्धव ठाकरेंच्या विलंबामुळे अखेर एकनाथ शिंदेंच बंड घडलं अन राज्यात भुकंप झाला. उद्धव ठाकरेंसोबत राहूनही अपमान वाट्याला आल्यानं केसरकर शिंदेच्या गटात सामील झाले. शिंदे सरकारचे ते प्रवक्ते बनले. एकहाती झुंज देत संजय राऊत नावाच्या तोफेला त्यांनी थंड पाडलं. अखेर महाराष्ट्रात पुन्हा एकदा जनमत असलेलं सेना-भाजप युतीच सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. शिंदे सरकारमध्ये केसरकरांच स्थान किती महत्त्वाचे होत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृतीतून स्पष्ट झालं. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री, कॅबिनेट मंत्र्यांची गर्दी असताना मोदींनी केवळ केसरकरांसोबत केलेलं हस्तांदोलन व विचारपूस बरंच काही सांगून गेलं.

वडील वसंतशेठ केसरकर यांनी समाजात केलेल्या कार्यामुळे त्यांना समाजकारणाची गोडी निर्माण झाली. यातूनच राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांच्या प्रेरणेतून 1992 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. स्वीकृत नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. 17 डिसेंबर 1996 मध्ये ते पहिल्यांदा सावंतवाडीच्या सर्वोच्च अशा नगराध्यक्षपदी विराजमान झाले. तब्बल ११ वर्ष त्यांनी सावंतवाडी शहराचं नगराध्यक्षपद भुषवल. सलग 3 टर्म नगराध्यक्ष अन सर्वाधिक काळ नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान हा त्यांनाच जातो. 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर पहिल्यांदाचं सावंतवाडीची विधानसभा लढविली अन् जिंकली. सेना प्रवेशानंतर युतीच्या सरकारमध्ये त्यांनी गृह व वित्त राज्यमंत्री म्हणून कारभार पाहिला. 2009,2014 आणि 2019 अशा सलग तीन टर्म सावंतवाडी मतदारसंघातून निवडून येण्याची हॅट्रिक करत इतिहास रचला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना डावलण्यात आले‌‌. मात्र, शिंदे- फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवत ही उणीव शिंदे- फडणवीस यांनी भरून काढली.

युती सरकारमध्ये शिक्षण खात्याची जबाबदारी केसरकरांवर सोपविण्यात आली. शालेय शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी शिक्षणव्यवस्थेत अमृलाग्र बदल घडवून आणलेत. शिक्षणमंत्री म्हणून सिंधुदुर्गात सगळ्यात मोठी नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा मंजूर केली. ज्या शाळेला ५०० रूमच हॉस्टेल आहे. स्कील डेव्हलपमेंटच सेंटर, मुंबई विद्यापीठाच सबसेंटर त्यांनी आंबोलीला मंजूर केलं आहे. माध्यमिकमध्ये ६१ हजार शिक्षकांना टप्पा अनूदानात आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तर पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती, दुसऱ्या टप्प्यात २० हजार शिक्षकांची भरती अशी महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच ५० हजार शिक्षकांची भरती होणार आहे. मुलांच्या शिष्यवृत्तीत पाच पटीनं वाढ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दारिद्र्य रेषेखालील व काही समाजातील मुलांनाच शिक्षणात सवलत होती. त्यामुळे मुलांमध्ये भेदभाव होत होता‌. मात्र, आता सर्व मुलांना गणवेश, बॅग, बुट, सॉक्स देण्याचा निर्णय मंत्री केसरकर यांनी घेत विचारांची प्रगल्भता दाखवून दिली आहे. आजी-आजोबा दिवस साजरा करायचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नविन शैक्षणिक धोरण आणल्यांनं व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यान धोरणात्मक निर्णय घेता आल्याच ते आवर्जून सांगतात. आजही अनेक धोरणात्मक निर्णय ते घेत आहेत. याच बरोबर मुंबई शहर आणि कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून पालकत्व देखील निभावत आहेत. यात पर्यटन जिल्ह्यात जन्म घेतल्यानं पर्यटनाबद्दलची त्यांची तळमळ कधीच लपून राहीलेली नाही. पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग राज्यात नाही तर देशात नंबर एकवर घेऊन जाण्याचा त्यांचा निर्धार आहे.

राज्यात शिंदे-फडणवीसांच्या सरकारला वर्ष पूर्ण होणार एवढ्यातच केसरकरांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाच शिंदे सरकारमध्ये सामील व्हा अशी ऑफर दिली. अन् २ जुलै रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी शपथही घेतली. आज महायुतीच सरकार राज्यात कार्यरत आहे.

दीपकभाईंची एकुणच राजकीय आणि सामाजिक वाटचाल सामान्य माणसांशी जोडलेली राहीली आहे. धार्मिक, आध्यात्मिक वारसा जपणारे भाई श्री साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. समाजातील सर्व घटकांना ते आपलं मानतात. जात, धर्म, पंत याच्या पलीकडे विचार करणारे ते राजकारणी असून त्यांच्या या स्वभावामुळे प्रत्येकाला ते आपल्या कुटुंबातील एक सदस्य वाटतात. राजकीय विरोधकही याला अपवाद नाहीत. बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारा हा नेता आहे. त्यांचं राजकारण देखील तेवढचं मुद्सद्दी आहे. शांत आणि संयमीपणे त्यांनी आखलेले डावपेच हे त्यात अडकल्यानंतरचं लक्षात येतात. म्हणूनचं दीपकभाईनी पायानं मारलेली गाठ आम्ही हातानं सोडवू शकत नाही अस जाहीर विधान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केल होत.

राज्याच्या राजकारणात कार्यरत असताना संधी मिळाल्यास देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची त्यांची इच्छा आहे. नरेंद्र मोदी व पक्षातील वरिष्ठांनी लोकसभा लढवायला सांगितली तर लढणार असल्याच ते सांगतात. राज्यात कार्यरत असताना मतदारसंघातही ते कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत. जनतेचे मार्गी न लागलेले प्रश्न मंत्रीपद व आमदारकीचा कार्यकाळ संपण्याआधी सोडवण्याचा त्यांचा दंडक आहे. शिंदे- फडणवीस यांच्या साथीनं सहा महिन्यांत कोकणचा कायापालट होणार असल्याचा दावा ते करतात. अनेक वर्षे रखडलेला कबुलायतदार गांवकर प्रश्न, सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटीचा प्रश्न मार्गी लावत त्यांनी ते सिद्धही केलय. राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वावर नगराध्यक्ष पदापासून कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत झेप घेत त्यांनी आपली कर्तबगारी सिध्द केलीय. अशा या कोकणच्या मुरब्बी नेत्यास ग्लोबल महाराष्ट्र चैनल कडून कोटी कोटी शुभेच्छा…!
         
राजकीय प्रवास !
1996 : पहील्यांदा सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी विराजमान
2009 : महाराष्ट्र विधानसभेवर पहिल्यांदा निवडून येत ‘आमदार’.
2014: महाराष्ट्र विधानसभेवर दुसऱ्यांदा निवडून आले.
2014: महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये अर्थ, ग्रामीण विकास ‘राज्यमंत्री’.
2014 : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ‘पालकमंत्री’.
2019 : महाराष्ट्र विधानसभेवर तिसऱ्यांदा निवडून येत विजयी ‘हॅट्रिक’ !
2022 : राज्य सरकारमधील शिंदे गटाच्या प्रवक्ते पदी निवड.
2022 : महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये शालेय शिक्षण विभागाचे ‘कॅबिनेट मंत्री’.

You cannot copy content of this page