मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून साजरा…

वाढदिवसाचे औचित्य साधून आपत्कालीन व्यवस्थापनासाठी सामाजिक बांधिलकीकडे आर्थिक मदत सुपूर्त

सावंतवाडी ता.१८-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस आज त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने येथील त्यांच्या कार्यालयात केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थितांकडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान यावेळी मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दिपक भाई मित्र मंडळाकडून सामाजिक संघटनेला आपत्कालीन व्यवस्थापनासाठी आर्थिक मदतीचा हात देखील देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी जेष्ठ नगरसेविका अनाराजीन लोबो, महिला शहराध्यक्ष भारती मोरे, तालुकाप्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, अब्जू सावंत, परशुराम चालवाडी नीलिमा चालवाडी, विशाल बांदेकर, पप्पू सावंत आबा केसरकर नंदू शिरोडकर महादेव राऊळ, शिल्पा सावंत,आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page