शेर्लेत घरावर झाड कोसळून नुकसान

⚡बांदा ता.१४-: शेर्ले जाधववाडी येथील अंकुश वामन जाधव यांच्या घरावर शुक्रवारी पहाटे फणसाचे झाड पडून नुकसान झाले. या दुर्घटनेत घराची कौले, वासे व अन्य सामानाची नासधूस झाली. शेर्ले तलाठी नेत्रा सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी करुन नुकसानीचा पंचनामा केला. यात जाधव यांचे १ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
    
शेर्ले परिसराला गुरुवार रात्री पासूनच मुसळधार पावसाने झोडपून काढले. रात्री तेरेखोल नदीपात्रानेही धोक्याची पातळी ओलांडली होती. पहाटेच्या सुमारास अंकुश जाधव यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळले. त्यावेळी जाधव कुटुंबिय घरात झोपले होते. मात्र या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. नुकसानीची पाहणी सरपंच प्रांजल जाधव, पोलीस पाटील विश्राम जाधव, तंटामुक्त अध्यक्ष शाम सावंत, सामाजिक कार्यकर्ते तात्या पावसकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page