⚡कुडाळ ता.१४-:लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांचा वर्ष २०२३ चा पदग्रहण सोहळा उद्या, शनिवार सायंकाळी ६.३० वाजता महालक्ष्मी सभागृह येथे होणार आहे.
नूतन अध्यक्ष सीए जयंती कुलकर्णी, सचिव स्नेहा नाईक, खजिनदार आनंद बांदिवडेकर, झोन चेअरमन अँड. समीर कुळकर्णी यांच्यासह लायन्स टीम पदभार स्वीकारणार आहेत. वर्ष २०२३ चे पदाधिकारी उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, सीए शैलेश मुंड्ये, सूरज भोगटे, सहसचिव सीए विवेक धुरी, सहखजिनदार कुणाल वरसकर, टेमर अँड. मिहिर भणगे, ट्विल ट्विस्टर मंजुनाथ फडके, पीआरओ सुधाकर कुळकर्णी, जीएसटी वैभव सावंत, जीएमटी डॉ. अमोघ चुबे, जीएलटी सीए सागर तेली, अँड. अजित भणगे, सुनेत्रा फाटक, सीए केशव फाटक, जी. दत्ताराम, अँड. अजित भणगे, सीए सुनील सौदागर, हेमंत कुडाळकर, मनोहर कामत, डॉ. विवेक पाटणकर, अँड. अमोल सामंत, मंदार परुळेकर, अँड. श्रीनिवास नाईक, अनंत शिंदे, नयन भणगे, स्नेहांकिता माने, अस्मिता बांदेकर आदी पदाधिकारी पदग्रहण करणार आहेत. हा पदग्रहण सोहळा पदग्रहण कार्यक्रमाला राजेंद्र शाह, गणेश प्रभुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
