⚡मालवण ता.१४-: विद्यार्थ्यांनी प्रशालेतून शिकून मोठे झाल्यावर प्रशालेबरोबरच संस्थेकडेही आदराने पाहिले पाहिजे. भविष्यात आपली शाळा, संस्था विद्यार्थ्यांनाच पुढे न्यायची आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मसुरे एज्युकेशन सोसायटीने दिलेले योगदान मोठे आहे, प्रतिपादन मसुरे आर पी बागवे हायस्कूल येथे बोलताना या संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब यांनी केले.
मसुरे येथे आर. पी. बागवे हायस्कूल येथे शिक्षण महर्षी मदन राजाराम बागवे पुरस्कार वितरण आणि संस्थेकडे ठेवलेल्या विविध दात्यांच्या रकमेतून येणाऱ्या व्याजातून रोख रकमेच्या पैशातून इयत्ता दहावी, बारावी आणि पाचवी ते नववी तसेच मसुरे केंद्र, तालुका, जिल्हास्तरीय दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव कार्यक्रम डॉ. दीपक मुळीक परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रुपयाची बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
यावेळी संस्थेच्या वतीने डॉ. दीपक परब यांना कोकण आयडॉल पुरस्कार आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला करण्यात आला. बिळवस ग्रामपंचायत च्या वतीने सुद्धा डॉ. दीपक मुळीक परब यांचा सरपंच मानसी पालव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रशालेचा माजी विद्यार्थी आकाश संतोष मसुरकर याची निवड महाराष्ट्र टेनिस क्रिकेट टीम मध्ये झाल्याबद्दल त्याचाही सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोदे, सूत्रसंचालन विशाखा जाधव, आभार एस. आर. कांबळे यांनी मानले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष उत्तम राणे,माजी सेक्रेटरी जयराम बागवे, मुंबई कमिटी सदस्य संजय बागवे, सुभाष बागवे ,महेश बागवे, सरोज परब, बिळवस सरपंच मानसी पालव, मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना कोदे, सखाराम कांबळे, विठ्ठल लाकम, आकाश मसुरकर, बाबुराव प्रभू गावकर, सोनोपंत बागवे, प्रकाश परब, राजन परब, मिलिंद प्रभू, रमेश चव्हाण, सोमाजी परब, उद्योजिका राधिका परब, शुभा प्रभू, चौगुले, शशांक पिंगुळकर, मसुरेकर, समीर नाईक, हळवे, बी एस ठाकूर, एन एस जाधव, दयानंद पेडणेकर ,जगदीश चव्हाण दत्तप्रसाद पेडणेकर, भानुदास परब, चरणदास फुकट, बाबाजी मेस्त्री, विशाखा जाधव, संस्थेचे सदस्य, प्रशालेतील माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
