वायरी प्रभागातील गणेश विसर्जन स्थळ व कब्रस्थानच्या कामासाठी निधी मिळावा

आप्पा लुडबे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

⚡मालवण ता.१०-: मालवण शहरातील वायरी प्रभागातील आडवण येथील गणेश विसर्जन स्थळ आणि वायरी मुस्लिम मोहल्ला येथील कब्रस्थानाच्या कामासाठी जिल्हा नियोजन मधून निधी मिळावा, अशी मागणी वायरी प्रभागाचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वायरी प्रभागातील आडवण भागातील गणेश विसर्जन स्थळ हे रस्त्यालगत असून खोल आहे ते बांधणे आवश्यक आहे. तसेच वस्ती लगत असल्याने सुशोभीतही करण्याची आवश्यकता आहे. तसेच मुस्लिम महोल्यालगत कब्रस्थान असून या कब्रस्थानात वजूखाण्याची इमारत नादुरुस्त असून अपघात होण्याची शक्यता आहे. तरी बांधकाम करण्याची आवश्यकता आहे. या कामाबाबत मागील चार वर्ष पाठपुरावा करूनही अल्पसंख्यांक निधी न मिळाल्याने होऊ शकलेले नाही. त्यामुळे या दोन्ही कामांसाठी आपण जिल्हा नियोजन मधून निधी देण्यात यावा, असे आप्पा लुडबे यांनी निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page