अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कणकवलीत १४ रोजी विशेष सभा

⚡मालवण ता.१०-:
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सिंधुदुर्ग शाखेची विशेष सभा शासकीय विश्रामगृह, कणकवली येथे शुक्रवार दि. १४ जुलै रोजी सायंकाळी ५ वा. आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र खानविलकर व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र संघटक हरिभाऊ पाथोडे हे मुंबई येथून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रसार आणि प्रचार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (पी.आय.एम.सी.) स्थापन झाली असून या समितीमार्फत जिल्ह्यामध्ये जादूटोणा विरोधी कायदा सन २०१३ राबविण्यात येणार आहे. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करणाऱ्या संस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी सिंधुदुर्ग यांनी केले आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये जादूटोणा विरोधी कायदा राबविण्यासाठी (पी.आय.एम.सी) सिंधुदुर्गला मदत करणे, शाळा ‘ विद्यालय, महाविद्यालय येथे कार्यक्रमाचे नियोजन करणे, अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रात्यक्षिकासह कार्यशाळा आयोजित करणे, आधी विषयांवर रविंद्र खानविलकर व हरिभाऊ पाथोडे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व सभासदांनी हितचिंतक आणि तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करावयाची आवड असणाऱ्या व्यक्तीनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे जिल्हा सरचिटणीस विजय चौकेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page