सरपंच, उपसरपंच संघटना तालुकाध्यक्षपदी पप्पू परब

⚡वेंगुर्ला ता.१०-: भारतीय जनता पार्टीच्या सरपंच, उपसरपंच संघटना वेंगुर्ला तालुकाध्यक्षपदी परबवाडा उपसरपंच पप्पू उर्फ विष्णू परब यांची निवड करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी याबाबतचे पत्र पप्पू परब यांच्याकडे सुपूर्द करत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
वेंगुर्ला तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांची सभा ९ जुलै रोजी भाजपा कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत सरपंच व उपसरपंच संघटना अध्यक्षपदी परबवाडा उपसरपंच पप्पू उर्फ विष्णू परब यांची एकमताने निवड तर उपाध्यक्षपदी अणसूर सरपंच सत्यविजय गावडे व भोगवे सरपंच प्रणिती आंबडपालकर, चिटणिसपदी रेडी सरपंच रामसिंग राणे आणि उर्वरित सर्व सरपंच व उपसरपंच यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व पदाधिका-यांचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडिस, समिर कुडाळकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, तालुक्यातील भाजपचे सरपंच उपसरपंच उपस्थित होते.
फोटोओळी – भाजप वेंगुर्ला सरपंच व उपसरपंच संघटना अध्यक्षपदी पप्पू परब यांची निवड झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page