वडाचे झाड बनले आहे धोकादायक

खरारे मार्गावरील प्रकार: तोडण्याची मागणी

मालवण ता.१०-:

मालवण तालुक्यातील पेंडुर – पराड राज्यमार्गावरील खरारे फाट्याच्या नजीक एक वडाचे झाड धोकादायकरीत्या रस्त्यावर कलंडलेले आहे. हे झाड पावसाळ्यातील वाऱ्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर पडुन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने वेळीच हे झाड बाजूला करावे, अशी मागणी पेंडूर ग्रामपंचायत सदस्य सौ. वैष्णवी लाड, शिवसेना पराड शाखाप्रमुख संतोष नागवेकर व पेंडूर शाखाप्रमुख निलेश हडकर , पेंडूर पराड येथील ग्रामस्थांनी केले आहे.
खरारे फाट्या नजीक असलेले हे झाड रस्त्याच्या डोंगराकडील भागात आहे. त्याचा पूर्ण तोल रस्त्याकडे आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. जोरदार वारे सुद्धा वाहत आहेत. तसेच पावसाने जमीन भुसभुशीत झाली आहे. परिणामी सोसाट्याचा वारा आल्यावर हे झाड उन्मळून रस्त्यावर पडण्याचा मोठा धोका संभवत आहे. दुदैवाने हे झाड रस्त्यावर कोसळले. त्याचवेळी तेथून वाहने जात असली तर मोठा अनर्थ घडू शकतो. ही संभाव्य धोक्याची शक्यता ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हे झाड तोडून धोका टाळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page