मिलाग्रिस च्या विद्यार्थ्यांचे ऑलंपियाड परीक्षेमध्ये यश…

⚡सावंतवाडी ता.१०-: 2022-23 रोजी घेण्यात आलेल्या 2nd Level च्या ऑलंपियाड परीक्षेमध्ये मिलाग्रिसच्या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले. यामधील गणित विषयामध्ये प्रशालेचा इयत्ता 7 वी चा विद्यार्थी कु.संस्कार जगदिश राऊळ याने विशेष प्राविण्य संपादन केले.

तसेच इंग्रजी या विषयामध्ये इयत्ता 8 वी च्या कु. निधी कानविंदे व कु.अवनी भांगले या विद्यार्थीनींनी विशेष यश संपादन केले . या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page