⚡कुडाळ ता.०३-: कुडाळ मराठा समाज हॉल येथे गुण गौरव समारंभ श्री. जॉयल डिसिल्वा यांच्या अध्यक्ष ते खाली संपन्न झाला. नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने सिंधुदुर्ग मधील जिल्यातील 10 अनाथ तसेच पर्यावरणसाठी काम करणाऱ्या संस्था, व सामाजिक स्तरावर उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.
श्री. कार्मिस आलमेडा वेंगुर्ला यांनी सामाजिक स्तरावर शासकीय योजना, कोरोना काळात मोठे योगदान, डोळ्यांची ऑपरेशन, वेगवेगळ्या सर्जरी या शासकीय योजनेत गोरगरीब लोकांना करून देत. गेली 20 वर्षे स्वतः रक्तदान करून 18 वर्षे रक्तदान शिबीर आपल्या मंडळाच्या वतीने भरवून रक्त दात्याना प्रत्येकी झाड देऊन पर्यावरण संबंधी आवड निर्माण करण्याचे काम केले. तसेच व्यसन मुक्ती वर शालेय मुलांना व्याख्यान देत मुलांचे प्रबोधन करण्याचे काम सातत्याने करत आहेत. यावेळी पर्यावरण प्रेमी, तसेच जिल्हा परिषद शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती श्री. संदेश किंजवडेकर ( कुडाळ गट शिक्षणाधिकारी ) श्री.विनायक परब ( संघटक सिंधुदुर्ग मराठा समाज ) श्री.गुरूदास परब ( उपाध्यक्ष अ.भा. यू.बँक सेना युनियन कोकण, कोल्हापूर गोवा राज्य ) श्री. तुषार सामंत (सरपंच मांडकुली ) श्री.बापू अशोक भोगटे ( पर्यावरण प्रेमी सिंधुदुर्ग ) श्री.रामचंद्र परब ( संघटक मराठा समाज.. सिंधुदुर्ग,श्री.धीरज परब व राजू मल्हार, कोकण सिंधुदुर्ग इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा पार पाडला…..
