⚡मालवण ता.०३-: मालवण दांडी येथील जि. प.शाळेतील सर्व ४२ विद्यार्थ्यांना कै.सौ.वर्षा विश्वास मोंडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री.विश्वास नारायण मोंडकर यांजकडून छत्र्या मोफत वाटप करण्यात आल्या.
यावेळी व्यासपिठावर दाते श्री.विश्वास नारायण मोंडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत चिंदरकर, उपाध्यक्ष पंकज धुरी, शिक्षणप्रेमी दिनकर शेलटकर, दयानंद मालंडकर, पांडुरंग सारंग, लिलाधर धुरी, रुपेश धुरी, सौ.धुरी, सौ.राधिका शेलटकर, सौ.जेनी, सौ.मनीषा ठाकुर, सौ.अमृता राणे, मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण, पदविधर शिक्षक शिवराज सावंत, श्री.चांदेरकर सौ.जोशी, सौ.कुबल, सौ.पिटकुर, श्री.जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी दानशुर व्यक्तीमत्व विश्वास मोंडकर यांचा विशेष सत्कार शा.व्य.स.अध्यक्ष हेमंत चिंदरकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज सावंत यांनी केले. तर आभार मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण यांनी मानले.
