⚡कणकवली ता.०३-: कणकवली येथील परमहंस भालचंद्र संस्थानात गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
भालचंद्र महाराज यांच्या
दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. उत्सवामुळे शहरात भक्तीमय वातावरण तयार झाले होते.
प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात सकाळच्या सत्रात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. दुपारी भालचंद्र महाराज यांची सामूहिक आरती झाली. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. विविध भजनी मंडळांनी भजने सादर करत वातावरण भक्तीमय केले. गुरुपौर्णिमेनिमित्त भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी फुलांची आरास करण्यात आली होती. ही आरास सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
