⚡बांदा ता.०३-: श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम प्रशालेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
स्थानिक समितीचे सदस्य लक्ष्मण गवस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाट्न संपन्न झाले. इयत्ता दुसरी तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी गुरुस्तवन केले व गुरुपूजन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व गुरुचे आपल्या जीवनातील महत्त्व या विषयांवर आपली मनोगत व्यक्त केली. सहशिक्षिका प्रतीक्षा शिरोडकर यांनी आपल्या जीवनातील गुरुचे महत्व सांगून मार्गदर्शन केले.
लक्ष्मण गवस यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व आपले विचार व्यक्त केले. यावेळी प्रशालेच्या सहशिक्षिका प्रतीक्षा शिरोडकर, वेलांकनी रॉड्रिक्स, प्राची परब, तेजस्वी गावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेलंकनी रोड्रिक्स यांनी केले तर आभार प्राची परब यांनी मानले.
