बांदा ता.०३-: रोटरी वर्षाच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे इन्सुली येथील जिल्हा परिषद शाळा नंबर २ मध्ये मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी मुलांना पावसाळ्यात घ्यावयाची आरोग्याची काळजी याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष रोहन कुबडे, संकेत वेंगुर्लेकर, सचिव अवधूत चिंदरकर, साईस्वरूप देसाई, निहाल गवंडे आदी उपस्थित होते.
इन्सुली उपकेंद्राचे आरोग्य सेवक साईस्वरूप देसाई, आरोग्य सेविका दीपा देसाई यांनी पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे रोग, त्यावर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
