माजी नगरसेवकांसह राजा शिवाजी चौक मित्रमंडळाकडून स्वागत
⚡सावंतवाडी ता.०३-: येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज नव्याने उप अधीक्षक म्हणून हजर झालेले डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवाळे यांचे माजी नगरसेवकांसह राजा शिवाजी चौक मित्रमंडळाकडून स्वागत करण्यात आले.
यावेळी राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माटेकर माजी नगरसेवक सुरेश भोगटे माजी नगरसेवक विलास जाधव उपाध्यक्ष बंड्या तोर्षेकर विजय पवार संजय साळगावकर संतोष मिस्त्री मार्टिन अलमेडा सत्यवान राऊळ हे उपस्थित होते.
डॉ. दुर्भाटकर यांच्या निवृत्तीनंतर स्त्रीरोगतज्ञ म्हणून ज्ञानेश्वर ऐवाळे यांना सावंतवाडी येथे आणा अशी मागणी सर्वात प्रथम माजी नगरसेवक श्री सुरेश भोगटे विलास जाधव यांनी केली होती. आज अखेर डाॅ.ऐवाळे यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यभार स्विकारला. त्याच्याकडे रुग्णालय उपअधीक्षक म्हणून जबाबदारीही देण्यात आली आहे. त्यावेळी त्यांचे सावंतवाडी येथे स्वागत करण्यात आले व भविष्यात चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आले.