आम्ही शरद पवार साहेबांसोबच…

अर्चना घारे परब; तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले शरद पवारांना समर्थ

⚡सावंतवाडी ता.०३-: आम्ही शरद पवार साहेबांसोबतच आहोत त्यांचा वारसा घेऊनच आम्ही पुढील काम करणार अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष र अर्चना घारे परब यांनी आज येथे दिली.दरम्यान आम्ही साहेबांसोबतच आशा आशयाचे टोप्या घालून त्यांनी आज शरद पवार यांचे समर्थन केले.

काल अजित पवार यांच्यासोबत काही आमदारांनी बंडखोरी करून भाजपची हात मिळवणी केल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पडली होती त्या पार्श्वभूमीवर आज येथील सावंतवाडी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपण शरद पवार साहेबांसोबत असल्याचे भूमिका जाहीर केले.

यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,देवा टेंमकर,हिदायतुल्ला खान, काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी, इफ्तिकार राजगुरू, जावेद शेख,अँड. सायली दुभाषी, चित्रा देसाई,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page