पत्रकार निलेश मोरजकर यांचा बांदा ग्रामपंचायतीकडून सत्कार…

बांदा/प्रतिनिधी
येथील ‘सकाळ’चे बातमीदार निलेश मोरजकर यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचा राष्ट्रीय पातळीवरचा ‘द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड’ प्राप्त झाल्याने बांदा ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.


श्री मोरजकर हे गेली २१ वर्षे पत्रकारितेत कार्यरत असून त्यांना गोवा येथे माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते भास्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडी यांचा जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देखील जाहीर झाला आहे.
सरपंच श्रीमती नाईक यांनी यावेळी श्री मोरजकर यांच्या कार्याचा गौरव करत आपण बांदा शहराच्या विकासासाठी पत्रकारितेतून योगदान दिले असून भविष्यात देखील समाजाच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याचे काम आपल्या लेखणीतून करावे असे आवाहन केले.
यावेळी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत, आबा धारगळकर, रुपाली शिरसाट, श्रेया केसरकर, रेश्मा सावंत, कल्पना परब, तनुजा वराडकर, दिपलक्ष्मी सावंत-पटेकर, सामाजिक कार्यकर्ते यशवंत माधव, वरिष्ठ लिपिक संजय सावंत, अमोल तांबुळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली शिरसाट यांनी केले.
फोटो :-
बांदा येथे पत्रकार निलेश मोरजकर यांचा सत्कार करताना सरपंच प्रियांका नाईक. सोबत उपसरपंच जावेद खतीब व इतर.

You cannot copy content of this page