माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर : सावंतवाडी बस स्थानक रस्ते, आंबोली परिसरात समस्यांचा डोंगर
सावंतवाडी : प्रतिनिधी
येथील सावंतवाडी एसटी बस स्थानक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, आंबोली एसटी स्टँड परिसरातील रस्त्यांची झालेली अवस्था धोकादायक बनली आहे. याचा नाहक त्रास प्रवासी, विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर सपशेल अपयशी ठरले आहेत. येत्या १५ दिवसाच्या आत जर रस्ते दुरुस्ती व परिसर स्वच्छ न केल्यास आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अपयशाचे खापर आंदोलन करून फोडण्यात येणार असल्याचा इशारा, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिला.
दरम्यान बस स्थानकातील प्रवाशांसाठी असलेले स्वच्छतालय देखील दुरुस्ती करण्यात यावे. तसेच रात्रीच्या वेळेस एसटी स्टँड परिसरात लाईट देखील सुरू करण्यात असे विविध समस्या येत्या 15 दिवसाच्या आत सोडवण्यात यावे अन्यथा केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आंदोलन विभाग असा इशारा देखील बबन साळगावकर त्यांनी यावे दिला आहे.
