राज्य उत्पादन शुल्कची कारवाई ; झाराप पत्रदेवी महामार्गावरील प्रकार
⚡बांदा,ता.३०-: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करणार्या एका स्कॉपिओचा राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने पाठलाग केला. मात्र त्यात असणारा संशयित तब्बल ३ लाखाची दारू आणि गाडी टाकून पळून गेला आहे. ही कारवाई काल रात्री झाराप-पत्रादेवी महामार्गावर मळगाव येथे करण्यात आली. या कारवाईत तब्बल १३ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
