पाळये ८२ वर्षीय महादेव दळवी बेपत्ता

आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन

दोडामार्ग:
पाळये येथील महादेव नारायण दळवी वय 82 वर्षे, हे 22 मे 23 रोजी पासून राहत्या घरातून नापता झालेले असून अद्यापही आढळून आलेले नाहीत. पोलीस नातेवाईक त्यांचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.


ते त्याचे राहते घरातून दि. 22/5/2023 रोजी सकाळी 06.00 वाजता गावातील नाल्यावर टॉयलेटला गेले असता परत आलेले नाहीत. वय वर्षे – 82 असलेल्या महादेव दळवी यांची उंची 5 फुट असून ते घरातून बाहेर पडले त्यावेळी फूल सफेद रंगाची बनियान व निळ्या रंगाची हाफ पँट घालून बाहेर पडलेले आहेत. त्यांचा रंग – सावळा, चेहरा – गोल, सुरकुत्या पडलेला, कैस – काळे पांढरट, बोलीभाषा मालवणी मराठी आहे. तरी सदर नापता व्यक्ती मिळून आल्यास संपर्क त्यांनी दोडामार्ग पोलीस निरीक्षक अरुण पवार मो. नं. 8691909111 , सहा. पोलीस उपनिरीक्षक संजय गवस, दोडामार्ग पोलीस ठाणे, मो. नं. 9423304004 यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन दोडामार्ग पोलिसांनी केलं आहे.

You cannot copy content of this page