भाजप नेते निलेश राणे यांचा शक्तीकेंद्र प्रमुखांच्या घरी ‘भेट’ संवाद

मोदी @9 अभियान अंतर्गत मालवणात शक्तिकेंद्र प्रमुख संपर्क अभियान

⚡मालवण ता.२९-: भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या प्रत्येक अभियानात मालवण कुडाळ मतदारसंघ अग्रस्थानी राहिला आहे. मोदी @ 9 अभियानातही त्याच तत्परतेने आपण सर्वांनी काम करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्ष कार्यकाळातील विविध योजना व विकासात्मक कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून संपर्क अभियान यशस्वीपणे राबवूया. असे आवाहन करत भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण शहर व तालुक्यातील शक्ती केंद्र प्रमुख यांच्या भेटी घेत बूथ अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष यांच्याशी गुरुवारी संवाद साधला.

कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मालवण तालुक्यात मोदी @९ अभियान अंतर्गत शक्तिकेंद्र प्रमुख संपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियांनांतर्गत निलेश राणे यांनी तालुक्यातील शक्तिकेंद्र प्रमुखांच्या घरी भेटी दिल्या. निलेश राणे यांनी भर पावसात दिवसभर तालुका दौरा केला.

या भेटीत संघटनात्मक चर्चा तसेच मतदारसंघात सुरू असलेल्या घरो घरी संपर्क अभियानाचा आढावा घेण्यात आला. गुरुवारी मालवण तालुक्यात या अभियानाचा शुभारंभ शहरातून करण्यात आला. शहरात मेढा येथील माजी नगरसेवक शक्ती केंद्र प्रमुख गणेश कुशे यांच्या निवासस्थानापासून दौऱ्याला सुरुवात झाली. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ 9090902024 या नंबरवर मिस्ड कॉल देत समर्थन देण्याचे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे. तसेच नऊ वर्षातील केलेल्या कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, प्रभारी संजू परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, मालवण तालुका अभियान प्रमुख आप्पा लुडबे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, दीपक पाटकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, पूजा करलकर, आबा हडकर, बबलू राऊत, राजू परुळेकर, संजय लुडबे, संजीवनी लुडबे, सुहास हडकर, महेश सारंग, दादा नाईक व अन्य उपस्थित होते. यावेळी निलेश राणे यांनी मालवण शहर व परिसरातील गणेश कुशे, पंकज पेडणेकर, प्रमोद करलकर, मंदार लुडबे, राम चोपडेकर, अशोक चव्हाण, विरेश मांजरेकर, आतिक शेख, राजन माणगावकर,महेश वाईरकर या शक्ती केंद्र प्रमुख यांच्या घरी भेट दिल्या.

यावेळी हरेश गावकर, मुन्ना झाड, भाई मांजरेकर, विक्रांत नाईक, मंदार लुडबे, ललित चव्हाण, राजू बिडये, नारायण लुडबे, संदेश तळगावकर, रामचंद्र करलकर, विशाखा पाटकर, सुहासिनी करलकर, रत्तनप्रभा पाटकर, बूथ अध्यक्ष निलेश लुडबे, खुशबू करलकर, दिप करलकर, संजय नाईक, सुमित सावंत, अमित सावंत, सुरेश चौकेकर, यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page