ट्रक – कार अपघातात.हडपीड गावातील ५ जण जखमी

असलदे दर्ग्यानजीक समोरासमोर धडक

⚡कणकवली ता.२८-: देवगड निपाणी महामार्गावर असलदे दर्ग्या नजीकच्या धोकादायक वळणावर ट्रक आणि महिंद्रा टियूव्ही कारची समोरासमोर धडक बसून अपघात घडला.या अपघातात कारमधील ५ जण जखमी झाले आहेत. अपघात सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला.

अपघातातील जखमींना कणकवली येथे खाजगी रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सर्व जखमी हडपीड गावातील आहेत. ए.एस. आय राजू उबाळे आणि वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी जात अपघातग्रस्त वाहने बाजूला करून झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. कारचालक अमोल मेस्त्री हे हडपीडहुन बेळगावच्या दिशेने आपल्या ताब्यातील कार घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या ट्रक आणि कारची समोरासमोर वळणावर धडक बसली.यात कारचे मोठे नुकसान झाले तर ट्रक चेही नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page