⚡कुडाळ ता.२७-: कुडाळ तालुक्यातील नूतन पोलीस निरीक्षक वृणाल मुल्ला यांची भेट घेऊन त्यांचे कुडाळ शिवसेना तालुक्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कुडाळ तालुक्यातील उद्भवणाऱ्या समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आल्या यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असून सर्वांच्या सहकार्याने आपण काम करूया असेही त्या म्हणाल्या.
त्याचप्रमाणे स्त्रियांवरील अत्याचार, तरुण, विद्यार्थी यांचा अमली पदार्थ, व्यसनाधीनता याठिकाणी असलेला कल दूर करण्यासाठी त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी जनजागृती शिबिराचे आयोजन शाळा, कॉलेज, महिलांच्या कार्यक्रमाद्वारे आयोजित करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन दिसला. या कार्यक्रमासाठी वर्षा कुडाळकर (जिल्हा महिला आघाडी प्रमुख), योगेश तुळसकर (तालुका प्रमुख), सिद्धी शिरसाट (महिला आघाडी तालुका प्रमुख), अरविंद करलकर (उप तालुका प्रमुख) आराध्या करलकर, अनघा रांगणेकर आदी उपस्थित होते.
