मनसेची मागणी; सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन
⚡सावंतवाडी ता.२३-: येथील मळगाव बाजारपेठ मळगाव इंग्लिश स्कूल समोरील रस्त्यावर गतिरोधक घालण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनद्वारे केली आहे. दरम्यान हे गतिरोधक न घातल्यास गावातील लोकांना घेऊन जन अक्रोश आंदोलन पुकारले जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की मळगाव या गावातील बाजारपेठेततील शाळेतील मुलांच्या कामासाठी आलेल्या लोकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात असते त्यात टू व्हीलर फोर व्हीलर डंपरची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते त्यातच काल एका धूम स्टाईल दुचाकीस्वाराने १३ वर्षीय मुलीला ठोकर दिली होती. त्यामुळे त्या ठिकाणी गतिरोधक घालण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
