गाबीत समाज शिष्टमंडळाने आ. वैभव नाईक यांची घेतली भेट

गाबीत समाजाचे प्रश्न अधिवेशनात मांडण्याची केली मागणी

⚡कणकवली ता.२३-: आरक्षण व आपल्या विविध मागण्यांसाठी गाबीत समाजाच्या शिष्टमंडळाने आज आमदार वैभव नाईक यांची कणकवली विजय भवन येथे सदिच्छा भेट घेतली. गाबीत समाजाचे प्रश्न अधिवेशनात मांडण्यासंदर्भात त्यांनी मागणी केली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी गाबीत समाजाच्या शिष्टमंडळाची भूमिका जाणून घेत त्यांची मागणी मान्य केली.
यावेळी गाबीत समाज विशेष मागास प्रवर्ग एस.बी.सी. संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सखाराम मालाडकर,नरहरी परब, दत्ताराम कोयंडे, सुरेश बापर्डेकर, दादा आजगावकर, प्रसाद बापर्डेकर, संकेत शेलटकर, प्रकाश बापर्डेकर, रविकिरण डुज्जी, विजय राऊळ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page