कुडाळ वर्धापन दिन २५ रोजी…

संत राऊळ महाराज महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन

⚡कुडाळ ता.२३-: मुंबई विद्यापीठ संलग्न क. म. शि. प्र. मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळचा ३८ वा वर्धापन दिन सोहळा रविवार, २५ जून २०२३ रोजी पार पडणार आहे. याबाबतची माहिती महाविद्यालये प्र. प्राचार्य व्ही. बी. झोडगे यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्र. प्राचार्य व्ही. बी. झोडगे म्हणाले की, संत राऊळ महाराज महाविद्यालय स्थापन होवून ३८ वर्षे होत आहे. २५ जून १९८४ मध्ये या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यापासून आजपर्यंत महाविद्यालय उतरोत्तर प्रगती करीत आहे. आज महाविद्यालयात ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांना महाविद्यालयातून सर्वोत्तम शिक्षण दिले जाते. आज महाविद्यालयात शिकलेले अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत.
यावेळी प्र. प्राचार्य व्ही. बी. झोडगे पुढे म्हणाले की, महाविद्यालयाला स्थापन होवून ३८ वर्षे होत आहेत. त्यानिमित्त प्रथमच वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. २५ जून २०२३ रोजी सकाळी ९.३० वा.
क. म. शि. प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष भाई तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली वर्धापन दिन सोहळा होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त, प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांची मुख्य उपस्थिती असेल. हा सोहळा एकनाथ ठाकूर सभागृह (दुसरा मजला) संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे संपन्न होईल.
या सोहळ्याला सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार परिषदेवेळी प्र. प्राचार्य व्ही. बी. झोडगे यांनी केले आहे. यावेळी प्रा. जमदाडे, प्रा. व्ही. जी. भास्कर, प्रा. अनंत लोखंडे, प्रा. एस. टी. आवटे, प्रा. एस. के. पवार, प्रा. संतोष वालावलकर, प्रा. केरवडेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page