आचरे गोळीबार प्रकरणातील प्रतीक हडकरला जामीन

⚡मालवण ता.२२-: आचरा येथील गौरव प्रकाश पेडणेकर यांना ४ मे रोजी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी प्रतीक एकनाथ हडकर (२१, रा. चिंदर सडेवाडी) याला जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. आहे. संशयितातर्फे जामिनासाठी अॅड. हेमेंद्र गोवेकर व अॅड. समीर कुलकर्णी यांनी अर्ज दाखल केला होता.

आचरा येथे घडलेल्या गोळीबार व चाकू हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी शुभम संतोष जुवाटकर (२७, रा. दांडी-मालवण), तौकिर अब्दुल हमीद काझी (२२, रा. आचरा काझीवाडा), प्रतीक एकनाथ हडकर (२१, रा. चिंदर सडेवाडी) या तिघांना अटक करण्यात आली होती. काही दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर तिघांनाही न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली होती. बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हे दाखल होते. गेले ४८ दिवस संशयित न्यायालयीन कोठडीत होते.

You cannot copy content of this page