भेटवस्तू देवून देण्यात आल्या शुभेच्छा
बांदा/प्रतिनिधी
बांदा पोलीस ठाण्यातून बदली होऊन गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आज पोलीस निरीक्षक श्यामराव काळे व उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला.
येथील पोलीस ठाण्यातून ज्योती हरमलकर व विठोबा सावंत यांची कुडाळ पोलीस ठाणे तर वाहतूक पोलीस विजय जाधव यांची दोडामार्ग पोलीस ठाणे येथे प्रशासकीय बदली झाली आहे. या सर्वाना बांदा पोलीस ठाण्याच्या वतीने आज निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक काळे व सर्व कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.