सावंतवाडीत हर घर मोदी अभियानाचा शुभारंभ

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त त्यांचे विचार तसेच त्यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘हर घर मोदी’ या अभियानाचा शुभारंभ सावंतवाडीत करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी तेली म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नऊ वर्षे पूर्ण झाल्यान मोदी @ 9 हा उपक्रम देशभरात राबवीला जात आहे. 9 वर्षांत मोदींनी केलेल काम जनसामान्यांपर्यंत पोहचवल जाणार आहे. ‘हर घर चलो’ अभियानाचा सावंतवाडीतून आज शुभारंभ करण्यात आला आहे. तर वंदे भारत एक्सप्रेस 27 जूनला सुटणार आहे. विविध विकासकाम सुरु केली जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप नेते महेश सारंग, बाळू देसाई, अँड. परिमल नाईक, रविंद्र मडगावकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, विनोद सावंत, चंद्रकांत जाधव, प्रमोद गावडे, महेश धुरी, दिलीप भालेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page