*💫मालवण दि.२६-:* मालवण तालुक्यातील धामापूर गावडेवाडी येथील मूळ रहिवाशी आणि आता मुंबई कळवा येथे राहणाऱ्या श्रीमती लक्ष्मी लवू गावडे (६५ वर्षे) यांचे नुकतेच मुंबई येथे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. कळवा येथील स्मशान भूमीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले.. लक्ष्मी गावडे यांचा भजन क्षेत्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या पश्चात मुलगा, सून,मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई मुलुंड येथील प्लॅटिनम या हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर आणि सुप्रसिद्ध भजनी बुवा संजय गावडे यांच्या त्या मातोश्री होत.
प्रसिद्ध भजनी बुवा संजय गावडे याना मातृशोक…
