प्रा. हंबीरराव चौगले व प्रा. हसन खान यांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान….

*💫मालवण दि.२६-:* महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फ़े कोकण विभागातील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये मालवण तालुक्यातून महाविद्यालयीन वरिष्ठ विभागातून स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणचे हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक हंबीरराव चौगले यांना आणि महाविद्यालयीन कनिष्ठ विभागातून रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय, मालवणचे भूगोल विषयाचे प्राध्यापक हसन खान यांना कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ओरोस येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे पार पडलेल्या सोहळ्यात राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोकण विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष कमलेश गोसावी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना तर्फे कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रा. हंबीरराव चौगले व प्रा.हसन खान यांचे मागील शैक्षणिक व सामाजिक कार्य पाहून त्यांचा गौरव करण्यात आला. या पुरस्कार प्राप्तीबद्दल कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, प्रा.डॉ.आर.एन. काटकर, सर्व प्राध्यापक वर्ग यांनी दोघांचेही अभिनंदन केले व त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page