*लाच घेतल्याने जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केली कारवाई*
*💫सिंधूदुर्गनगरी दि.२६-:* कुडाळ तालुक्यातील कसाल मंडळ अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना लाच घेतल्याने जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यानी निलंबित केले आहे. मंडल अधिकारी हांगे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने चार हजार रूपयांची लांच घेताना बुधवारी १७ फेब्रूवारी रोजी रंगेहाथ पकड़ले होते. सातबारा नोंद मंजूर करण्याकरिता हांगे यानी या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार पद्मनाभ परब यानी केलेल्या फिर्यादिनुसार सापळा रचून ही कारवाई कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर हांगे यांना जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना २० फेब्रूवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयीन कोठडी झाली होती. त्यानंतर ते जामिनावर मुक्त होते. दरम्यान, आज जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यानी हांगे यांना निलंबित केले आहे.