*नगराध्यक्ष परब यांच्या वडिलांशी कौटुंबिक संबंध असल्याने त्यांना माझे नेहमीच सहकार्य राहणार; आमदार केसरकर यांची माहिती*
*💫सावंतवाडी दि.२६-:* सावंतवाडी शहरात विकास कामांसाठी जेवढा निधी आला आहे. त्याचा नगराध्यक्ष हे विचार देखील करू शकत नाहीत. त्यामुळे माझ्यावर टिका करताना नगराध्यक्षांनी थोडासा विचार करावा तसेच आता पर्यत शहरात झालेली सर्व विकास कामांची उद्घाटन ही माझ्या कारकिर्दीत मंजूर झालेली कामे होती. अशी माहिती आमदार दिपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच नगराध्यक्ष परब यांच्या वडिलांचे आणि माझे कौटुंबिक संबंध असल्याने त्यांना माझे नेहमी सहकार्य असणार आहे असे आमदार केसरकर म्हणाले आहेत.