निलेश राणे यांच्या वक्तव्याचा महामार्गावर राष्ट्रवादीने केला निषेध

राणेंचा जाळला प्रतिकात्मक पुतळा

कुडाळ : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर बोलण्याची निलेश राणे यांची पात्रता नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य करताना शरद पवार हे औरंगजेबाचा पुनर्जन्म असल्याची टीका केली होती. त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ येथे
निषेध व्यक्त केला. यावेळी निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चप्पल मारून निषेध नोंदविला.


यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, महिला जिल्हाध्यक्षा अर्चना घारे- परब, भास्कर परब, बाळ कनयाळकर, प्रफुल्ल सुद्रीक, आत्माराम ओटवणेकर, निलेश गोवेकर, रूपेश जाधव, प्रज्ञा परब, दर्शना देसाई, रवींद्र चव्हाण, डॉ. संजीव लिंगवत, संग्राम सावंत, पुंडलिक दळवी, साबा पाटकर, शिवाजी घोगळे, सूरज खान, नझीर शेख, सावळाराम अणावकर, महेश कदम, जयराम डिगसकर, धर्माजी बागकर, स्वप्नील राऊळ, सुभाष तांडेल, प्रभाकर पवार, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page