⚡कणकवली ता.१०-: महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनच्यावतीने
११ जुन २०२३रोजी स.९.३० वा. सिंधुदुर्ग जिल्हा कॅडेट निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे करण्यात आलेले आहे.
तरी जिल्ह्यातील इच्छुक ज्युदो पट्टूनी विविध वजनी गटानुसार या निवड चाचणीला उपस्थित राहावे.
खेळाडूंनी निवड चाचणी स्पर्धेला सहभागी होण्यासाठी मुळ जन्मदाखला व तीन झेरॉक्स, मुख्याध्यापक सहीनिशी शाळेच्या लेटरहेड वर फोटोसह खेळाडुचे माहिती असलेले पत्र
( ज्या लेटरहेडवर विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव,जन्मतारीख, वडिलांचे नाव, विद्यार्थी शिकत असलेले वर्ग, पत्ता,टेलिफोन क्रमांक, आणि शाळेचा फॅक्स व शाळेचा दुरध्वनी क्रमांक लिहिलेला असायला हवा.ही माहिती विद्यार्थ्याच्या पासपोर्ट आकाराच्या फोटोवर रबरी शिक्का आणि मुख्याध्यापक प्राचार्य यांच्या स्वाक्षरी केलेली असावी.),
मुळ आधारकार्ड आणि तीन झेरॉक्स हे तीनही दाखले अनिवार्य आहे याची नोंद खेळाडू आणि प्रशिक्षकांनी घ्यावी.याशिवाय खेळाडुनी सोबत तीन रंगीत फोटोही घेऊन यावेत.
ज्यां खेळाडुंची जन्मतारीख २००६ ,२००७ ,२००८ मध्ये आहेत तेच खेळाडू निवड चाचणीसाठी पात्र ठरतील.१८वर्षाखालील खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पालकांचे संमत्तीपत्र जिल्हा संघटनेकडे देणे अनिवार्य आहे.अन्यथा संबंधित खेळाडूंना या निवड चाचणीत खेळता येणार नाही याची नोंद घ्यावी.
तरी जिल्ह्यातील इच्छुक ज्युदो खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे पदाधिकारी व प्रशिक्षक अभिजीत शेट्ये मोबा. 78410 17842 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
