शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे ११ रोजी पारितोषिक वितरण

⚡मालवण ता.०८-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर यांच्या वतीने रविवार दिनांक ११ जून सकाळी १०:३० वाजता सानेगुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी घेण्यात आलेल्या शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बाल- कुमार ज्ञान कोपरा याचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.

बाल – कुमार ज्ञान कोपरा मार्फत ११जून ते ११ ऑक्टोबर पर्यंत जे विद्यार्थी विद्यार्थिनी साने गुरुजी वाचन मंदिरचे वाचक सभासद होऊन जास्तीत जास्त पुस्तके वाचतील त्यांना १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणादिनाचे औचित्य साधून गौरविण्यात येईल. यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. या कार्यक्रमाला वाचन प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन साने गुरुजी वाचन मंदिरच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page