Headlines

उभादांडा येथे संयुक्त “कृष्ण दर्शन’

⚡वेंगुर्ला ता.०८-: उभादांडा येथील श्री केपादेवी मंदिरात शनिवार दि. 10 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता “कृष्ण दर्शन’ हा संयुक्त दशावतार नाट¬प्रयोग सादर होणार आहे.

या नाटकात यशवंत तेंडोलकर, मोरेश्वर सावंत, दत्तप्रसाद शेणई, गौरव शिर्के, संजय वालावलकर, महेंद्र कुडव, उदय मोर्ये, सुधीर तांडेल, अनिल घावनळकर, ज्ञानेश्वर परब आदी कलाकार भुमिका साकारणार असून यांना मयुर गवळी, बाबा खानोलकर, अर्जुन सावंत व आकाश खानोलकर आदी संगितसाथ करणार आहेत. तरी नाट¬रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक श्री केपादेवी तरुण हौशी नाट¬प्रेमींनी केले आहे.

You cannot copy content of this page