तुषार पवारचा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाने केला सत्कार

⚡कणकवली ता.०४-: युपीएससी परीक्षेत यश संपादन करुन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या
तुषार दीपक पवार याचा कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला.

तुषार पवार याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत युपीएससी परीक्षेत यश संपादन करीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. कणकवली येथील शिवाजीनगर येथे राहून हे यश संपादन केले आहे. तुषार पवार याला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ यांच्यावतीने तुषार पवार याचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. डिचोलकर, आनंद पारकर, अनिल मुंज, भैय्या आळवे, चेतन मुंज, कल्याण पारकर यांच्यासह तुषारचे वडील दीपक पवार हे उपस्थित होते.

You cannot copy content of this page