वेंगुर्ले तालुक्यात 10 वी मध्ये प्रथम आलेली कु.प्रतिक्षा नाईक हीचा भाजपा च्या वतीने सत्कार…

⚡वेंगुर्ले ता.०३-: वेंगुर्ले तालुक्यात न्यु इंग्लिश स्कुल उभादांडा ची विद्यार्थिनी प्रतीक्षा नाईक व अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळेची कु. परी सामंत या दोघींनी ९८.२०% गुण मिळवून संयुक्तिक प्रथम क्रमांक मिळवला .
परबवाडा – कणकेवाडी मध्ये रहात असलेली प्रतीक्षा प्रदीप नाईक हिचा तिच्या निवासस्थानी जाऊन भाजपा वेंगुर्ले च्या वतीने परबवाडा सरपंचा शमिका बांदेकर व ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस यांच्या हस्ते शाल , पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला .

यावेळी तिची आई पौर्णिमा नाईक हीचाही सत्कार करण्यात आला.


यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , उपसरपंच पपू परब, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रा. सदस्य हेमंत गावडे, माजी सभापती सारिका काळसेकर , ग्रा. स. सुहीता हळदणकर व स्वरा देसाई, योगिता नाईक, डॉ. बाळू गवंडे, चेतन देसाई, शैलेश बांदेकर, भारती नाईक उपस्थित होते.

You cannot copy content of this page