रुपेश राऊळ; आमदारकीला यश येणार नाही म्हणून हवा सोडली..
⚡सावंतवाडी ता.२९-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आता खासदार काय आमदारही होऊ शकणार नाही आपण खासदारकी लढवणार असे त्यांनी केलेले विधान म्हणजे कुठेतरी वरिष्ठांवर दबाव टाकून किमान विधान परिषद तरी पदरात पाडून येण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे केसरकर आणि खासदार विनायक राऊत यांच्यात तुलनाच होऊ शकत नाही दिलेला वेळ, शब्द आणि माणूस जपणारा नेता म्हणून खासदार राऊत यांची ओळख आहे उलट पक्षी केसरकर यांनी वेळ आणि शब्द कधीच पाळला नाही अशी टिका ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केली.
ते पुढे म्हणाले आमदारकी लढायला केसरकर घाबरले आहेत आमदारकीला यश येणार नाही म्हणून कुठेतरी हवा सोडून वरिष्ठांवर दबाव आणून विधान परिषद पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणून ते खासदारकीच्या बाता मारत आहेत
