रुपेश राऊळ;निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची पालकमंत्र्यांनी चौकशी करावी
सावंतवाडी ता.२९-: तालुक्यातील रस्त्याची काम ही निष्कृष्ट दर्जाची सुरू असून या सर्व रस्त्याची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
दरम्यान पावसाळ्यात जर रस्त्यावर खड्डे पडून अपघात घडून एकदाचा मृत्य् झाला तर तो मृतदेह आम्ही बांधकाम विभागवर घेऊन जाऊ असा इशार रूपेश राऊळ यांनी दिला आहे.
